Inspire Bookspace
Garbhanal by Rohini Kulkarni
Garbhanal by Rohini Kulkarni
Couldn't load pickup availability
‘‘मन्ना, येती दोन वर्षे तर ती इथेच आहे ना? माणसाचे आजचे विचार उद्याला टिकून राहतात का? आजची तिच्या मनातली नाराजी नेहमीसाठी टिकेल ह्याचा काय भरवसा? कालपुरुषाचा महिमा मी तुला सांगायला हवा का? आपण फार क्षुल्लक असतो बेटा त्याच्या शक्तीपुढे. तू एवढी शिकलेली विचार करणारी पण अदृश्य भविष्यामुळे अशी कशी कष्टी होऊन बसतेस?’’ ‘‘खूप एकटं वाटतं गं आई, म्हणून असा तोल सुटतो.’’‘‘एकटं कोण नसतं? आईच्या गर्भनाळापासून विलग झालेला जीव आणि आपल्या अखेरच्या क्षणाच्या झटापटीत सापडलेला जीव सारेच एकटे असतात. अनेक प्रकारच्या भ्रमांची सोबत घेऊन आपण जगत असलो तरी एकटेपणा हेच प्रत्येकाचं भागदेय असतं ना? थोडं मन स्थिर करायला शिकावं.’’
