Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Gara Gara By Anant Bhave

Gara Gara By Anant Bhave

Regular price Rs. 22.50
Regular price Rs. 25.00 Sale price Rs. 22.50
Sale Sold out
Condition
Publication
Language
छोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या 5 संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. 
View full details