Half Price Books India
Gappa Cinemachya by Javed Akhtar - Nasrin Munni Kabir
Gappa Cinemachya by Javed Akhtar - Nasrin Munni Kabir
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
जावेद अख्तर यांची नसरीन मुन्नी कबीर यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत म्हणजे हे पुस्तक. एका प्रतिभासंपन्न कवी आणि लेखकाबरोबर साधलेला हा संवाद आपल्यासमोर जावेदसाब यांचं आयुष्य उलगडून दाखवतो. त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांच्या लिखाणावर सुरवातीच्या काळात पडलेला प्रभाव, सलीम खान यांच्याबरोबरचा प्रवास; अशा अनेक गोष्टींवर यातून प्रकाश पडला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९६५च्या दरम्यान क्लॅपरबॉय म्हणून सुरू केलेली कारकीर्द या मुलाखतीमधून समोर येते. हिंदी चित्रपटाची परंपरा, गीत लेखन आणि पटकथालेखन या वेगवेगळ्या घटकांवर तर जावेदसाब बोलले आहेतच, पण राजकीय विचारही त्यांनी स्पष्टपणे मांडले आहेत. म्हणूनच चित्रपट कलेविषयी आस्था आणि रूची असणार्या सगळ्यांसाठी चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवाद केलेलं हे पुस्तक महत्त्वाचं ठरेल असा विश्र्वास वाटतो.
