Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Ganibajavani by Abhijit Desai

Ganibajavani by Abhijit Desai

Regular price Rs. 222.00
Regular price Rs. 249.00 Sale price Rs. 222.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
हिंदी चित्रपटसंगीत ही आपली सगळ्यांचीच मर्मबंधातील ठेव आहे. जो कधी फिल्मी धुन गुणगुणला नाहीअसा माणूसच जन्माला आलेला नाही. चित्रपटांतील गाण्याबजावण्याने एक मोठं कार्य केलंय. समाजाच्या विविध थरांतीलविविध जातीधर्मांच्या, विविध वयोगटाच्याविविध वृत्तींच्या व विविध विचारसरणींच्या या खंडप्राय देशातील कानाकोपर्‍यात पसरलेल्या माणसांना एका धाग्यात गुंफणारा व सुरांनी बांधून ठेवणारा असा हा अनमोल खजिना आहे. त्याला कमी प्रतीचंहलकं व सवंग मानल्याने त्याचे महत्त्व व कार्य कमी होत नाही. सबंध देश ‘धीर से आजा री’ किंवा ‘दीदी तेरा देवर दिवाना’ म्हणतोतेव्हा राष्ट्रीय एकात्मतेची भावना आपसूक जोपासली जाते. संगीतात नवं-जुनं असं काही नसतं. जुनं ते सगळं चांगलं व नवीन ते सगळं वाई. असंही नसतं. कान ही एकमेव कसोटी व मोजपट्टी ठेवलीतर या नव्याजुन्याच्या संघर्षात तुम्ही अडकत नाही. मनमंदिरात मानाने विराजमान होणारे व तिथे दीर्घकाळ गुंजारव करणारे सूर हवेत. असे सूर व त्यांच्या सुरेल कहाण्या वाचकांपर्यंत आणण्याचे स्तुत्य काम अभिजीत देसाई यांनी केले आहे. सुरांचे नाते हे जन्मजन्मांतराचे असते. ज्याला आयुष्यात सूर सापडलातो भवसागर पार करून गेला. - शिरीष कणेकर
View full details