Half Price Books India
Ek Hoti Radha by Saadat Hasan Manto
Ek Hoti Radha by Saadat Hasan Manto
Regular price
Rs. 159.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 159.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
‘मंटो’ हे भारतीय साहित्यातील एक महत्त्वाचं नाव आहे. फाळणीनंतर जरी तो पाकिस्तानात गेला असला तरी त्याच्या आयुष्यातली मह्त्त्वाची वर्षे भारतातच गेली होती. त्याचं मनं भारतातच गुंतलं होतं. त्याच्या कथांच्या नायिकाही मुंबईतल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. नकाशावर रेषा ओढून देश वेगळे करता येत असतील पण माणसांची मनं वेगळी करता येत नाहीत हेच खरं. मंटो लिहित होता तेव्हा पुरुषप्रधानता आजच्यापेक्षा कितीतरी जास्त होती. त्याकाळी मंटॊ आपली लेखणी सरसावून स्त्रियांच्या बाजूने उभा राहिला आणि त्या स्त्रिया तरी कोण होत्या? तर ज्यांना समाज हीन मानतो अशा. वेश्यांच्या दु:खांना तर त्याने आपली लेखनीच समर्पित केली होती. त्या स्त्रियांचे प्रश्न, संवेदना, औदार्य, त्याग, मान अपमान, प्रेम आणि त्यांची एकंदर समज हे सर्व कथांचे विषय होत असत. त्यासाठी त्याला खूप शिव्याही खाव्या लागल्या. पण त्याच त्याला पुरस्करांसमान वाटतात. ‘मंटो’च्या या संग्रहात नायिकाप्रधान कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत व अनुवादक आहेत चंद्रकांत भोंजाळ.
