Inspire Bookspace
Ek Dukh Manat Laplela by Prashant Velapure
Ek Dukh Manat Laplela by Prashant Velapure
Couldn't load pickup availability
केवळ हौस म्हणून वा उत्साह म्हणून शब्दांशी खेळणारे जे नवोदित कवी
आज आपणास दिसतात; त्यापेक्षा श्री. प्रशांत वेळापुरे यांची कविता सर्वस्वी वेगळी आहे. जीवनाविषयी स्वत:चे काही वेगळे सांगू पाहणारे आणि काव्यनिर्मितीकडे गांभीर्याने पाहणारे ते एक कवी आहेत. एका तपाहून अधिक काळ ते कवितेची मन:पूर्वक साधना करीत आले असून जीवनाला लालित्य आणि लालिभा प्राप्त करून देणार्या विशुद्ध प्रीतीच्या आविष्कारापासून तो अवती-भवतीच्या समाजातील शोषितांच्या दु:खापर्यंत त्यांची काव्यप्रतिभा संचार करणारी आहे. दु:ख हा त्यांच्या कवितांचा स्थायीभाव असला तरी या दु:खाला अनेक पदर लाभले आहेत. अनेक सूर लाभले आहेत. भूक शमविण्यासाठी स्वत:चा देह अंथरणार्या माऊलीच्या दु:खापासून तो मुखवटे धारण करणार्या प्रतिष्ठित बदमाशाकडून फसविल्या गेलेल्या सामान्य माणसापर्यंतचे दु:ख येथे प्रकट झाले आहे. आणि तेही काव्यात्म स्वरूपात सहज नि स्वाभाविक शब्दकलेतून नि कवितेवरील अभंग निष्ठेतून जन्मलेल्या वृत्तीतून.
- द. ता. भोसले
