Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Don Dirghakatha By Subhash Avchat

Don Dirghakatha By Subhash Avchat

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Condition
Publication
Language

मुळात तिरपागडी माणसं मला आवडतात. इतरांना विचित्र वाटणार्‍या त्यांच्या आयुष्यात मी सहज शिरू शकतो. त्यांच्या आयुष्यातले तुकडे उचलून आणू शकतो. भणंग, सरकलेल्या, गोंधळलेल्या, बिचकलेल्या, कुचंबलेल्या आयुष्यांचे कुणाला न दिसणारे कप्पे मी आयुष्यभर चाचपत राहिलो आहे. त्यात ते १९७०चं दशक. कशाकशाने सतत धुमसत असलेल्या, पेटलेल्या माणसांच्या गर्दीत मी होतो. मीही त्या पेटलेल्या काळासारखाच... भणंग. बेबंद. कशाची पर्वा नसलेला. रक्त गरम होतं. - माणसांच्या त्या जंगलात भेटलेली ‘मॅडम' आणि ओतूरच्या एका जुन्या, पडक्या वाड्याच्या भुसभुशीत जमिनी उकरत सुटलेली भागी! तिचा मुलगा झुंग्या, त्याची सर्कीट भावंडं आणि त्या विचित्र अंधारात लपून राहिलेले त्यांचे लैंगिक गुंते! - यांच्या या दोन दीर्घकथा ! एका गोष्टीत मीही आहे. - झुंग्याचं मांजर तो मी !!

View full details