Inspire Bookspace
Dnyaat Adnyaat Ahilyabai by Vinay Khadpekar
Dnyaat Adnyaat Ahilyabai by Vinay Khadpekar
Regular price
Rs. 345.00
Regular price
Rs. 370.00
Sale price
Rs. 345.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
अहिल्याबाई होळकर! जन्म ३१ मे १७२५. मृत्यू १३ ऑगस्ट १७९५. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा— तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.
