Half Price Books India
Diet Sukhacha by Yana Gupta
Diet Sukhacha by Yana Gupta
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आहार, व्यायाम आणि मनःशांती यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजची आघाडीची मॉडेल, अभिनेत्री याना गुप्ता हिने आहार, वजन आणि मनःशांती यांचा मेळ कसा साधायचा, हे या पुस्तकातून सांगितले आहे. फिटनेसबद्दल प्रेरणादायी आणि नवीन दृष्टी देणारं हे पुस्तक म्हणजे फिटनेसचं ‘बायबल’च आहे. बारीक होणं, उठावदार रूप, वजन कमी करणं महत्त्वाचं की तंदुरुस्त राहणं महत्त्वाचं, याचा शोध घेण्यास हे पुस्तक मदत करतं. खाण्याच्या चुकीच्या सवयी कशा सोडाव्या, नकारात्मक विचारांचं नियंत्रण कसं करावं, स्वतःवर प्रेम करायला कसं शिकावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक शरीराबरोबरच मनाच्या आरोग्याची प्राप्ती करून देणारं रामबाण डाएट सांगतं. स्वतःचं शरीर जसं आहे, तसं स्वीकारलं तरच वजन कमी करता येईल आणि सुख व आरोग्य मिळवता येईल, हे यानाचं साधं-सोपं तत्त्वज्ञान सहजपणे आचरणात आणण्यासाठी हे पुस्तक मदत करतं. नेहमीच्या आहारातून आणि मनाच्या कणखरपणातून स्वतःचा कायापालट करणं कसं शक्य आहे, याचा गुरुमंत्रच याना या पुस्तकातून देते.
