Dhadpadnarya Tarunaisathi by Sandipkumar Salunkhe
Dhadpadnarya Tarunaisathi by Sandipkumar Salunkhe
Regular price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 252.00
Unit price
per
स्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं... काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही... अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन... एकेकाळी रस्त्यावरचं शेण वेचून गोवऱ्या रचणारा तो गरीब ग्रामीण युवक आज एक यशस्वी उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. पण स्वत:च्या यशाच्या धुंदीत तो बांधवांना विसरलेला नाही. भेटतील त्या सा-यांना प्रेरणेचे दिवे आंदण देत तो सांगतोय - नवं ताजं अनुभवामृत. आजच्या अन् उद्याच्या तरुणाईसाठी...