Half Price Books India
Bokya Satbande Full Set of 10 Parts by Dilip Prabhawalkar
Bokya Satbande Full Set of 10 Parts by Dilip Prabhawalkar
Regular price
Rs. 1,152.00
Regular price
Rs. 1,280.00
Sale price
Rs. 1,152.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
भाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून `हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, `चौकटराजा' मधल्या नंदू आणि `श्रीयुत गंगाधरे टिपरे'तल्या आबांपासून `लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ. बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! `गुगली', `नवी गुगली', `हसगत', `कागदी बाण' व `झूम'नंतरचं प्रभावळकरांचं `बोक्या सातबंडे' हे एक झक्कास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.



