Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Baadha By Madhukar Dharmapurikar

Baadha By Madhukar Dharmapurikar

Regular price Rs. 69.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 69.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
संपादक : मधुकर धर्मापुरीकर

प्रेम आणि वासना, मोह आणि आकर्षण यातील सीमारेषा आखता येऊ नये असे प्रसंग अनेकांच्या वाट्याला येतात. मात्र बहुसंख्यांना अशा अनुभवातून आरपार गेल्यानंतरच आपल्या वाट्याला काहीतरी विलक्षण असं येऊन गेलं, अशी जाणीव होते. 'बाधा' या मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केलेल्या कथासंग्रहात अशाच अस्फुट अनुभवांचं फार सशक्तपणं केलेलं चित्रण आहे. वामनराव चोरघडे (घार), व्यंकटेश माडगूळकर (बाजाराची वाट), पु. भा. भावे (सीमेवर), रोहिणी कुलकणीर (आदम आणि ईव्ह), वसंत नरहर फेणे (स्थूल आणि सूक्ष्म), मधुकर धर्मापुरीकर (बाधा), रंगनाथ पठारे (गाभ्यातील प्रकाश), भारत सासणे (एका प्रेमाची दास्तान) इत्यादि लेखक आणि त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत.
-- श्रीराम शिधये, म. टा. १५ जानेवारी २०१२
View full details