Half Price Books India
Arthat By Achyut Godbole
Arthat By Achyut Godbole
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
हे पुस्तक म्हणजे वास्तविक पाहता तीन पुस्तकांचा ऐवज होय. अर्थशास्त्राचा इतिहास, सिद्धांत, ते सिद्धांत प्रस्थापित करणारे अर्थतज्ज्ञ आणि हे सारे अर्थशास्त्रीय सिद्धांत ज्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय परिस्थितीच्या विशाल पार्श्वभूमीवर समूर्त झाले, ती पार्श्वभूमी साद्यंत कथन करणे याला तीन स्वतंत्र ग्रंथांचा अवकाशच हवा. हा सारा अवकाश एकाच पुस्तकात सामावण्यास प्रचंड आत्मविश्वास हवा. लेखकाच्या ठायी तो पुरेपूर आहे. अर्थशास्त्रासारख्या किचकट, रुक्ष, बोजड, अक्राळविक्राळ समजला जाणारा विषय विलक्षण रंजकपणे सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत आणून बसविणे, ही आर्थिक साक्षरतेची गरज आज वाढत्या प्रमाणात जाणवत असताना मोठी उपकारक गोष्ट ठरते.
"अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय अचूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल."
-- डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार
"अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं 'अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. लेखकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक दोघांनीही जरूर वाचावे."
-- डॉ. डी. एम. नाचणे, डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, मुंबइ
"सर्वसमावेशी, बहुआयामी आकलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा आहे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून टाकते!"
-- डॉ. अभय पेठे, डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ