Inspire Bookspace
Agnishikha By Rajendra Deshpande
Agnishikha By Rajendra Deshpande
Couldn't load pickup availability
Agnishikha By Rajendra Deshpande
राणीचे जीवन हे एखाद्या महाकाव्याप्रमाणे आहे. पण या महाकाव्यात स्त्रीने अबला म्हणून जगणे तिला पसंत नाही. सीता, शंकुंतला, द्रौपदी यांसारखे पुरुषांच्या पाठीमागे फरफटत जाणे तिने स्वीकारले नाही. प्रत्येक संकटांना ती धीरोदात्तपणे सामोरी गेली. राणीच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे आहेत. लहानपणी नानासाहेबांसोबत मर्दानी खेळ खेळणारी मनू वेगळी आहे.तिचे गंगाधररावांसोबत लग्न झाल्यावरची राणी अजून वेगळी आहे. गंगाधरराव हे परंपरावादी विचारांचे होते. सुरुवातीला तिच्या कर्तृत्त्वाला फार वाव नसला तरी तिथेही तिने आपली खेळाची आवड जोपासली आहे. लग्नानंतरच्या काळात इतर स्त्रियांप्रमाणे तीही आपल्या संसारात स्थिर झालेली सिसते. तिला मुलगाही झाला पन नियतीने तीन महिन्यातच त्याला तिच्यापासून हिरावून घेतले. दुर्दैवान अल्पवयात तिच्या नशिबी वैधव्य आले. पण त्यानंतरचे तिचे कर्तृत्व ठळकपणे दिसू लागले.
