Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Afagani Atireki Ani Khamanag Thalipeeth By Jyant D Salgawkar

Afagani Atireki Ani Khamanag Thalipeeth By Jyant D Salgawkar

Regular price Rs. 79.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 79.00
Sale Sold out
Condition
ई-सकाळ १० नोव्हेंबर २००६
हलकंफुलकं, परंतु मार्मिक

दिवसेंदिवस प्रत्येकालाच जागतिकीकरणाच्या वाढत्या स्पर्धेतील ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जयंत द. साळगावकर यांनी "अफगाणी अतिरेकी आणि खमंग थालीपीठ' हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित करून वाचकांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ......
एकूण अकरा कथांचे शीर्षक "हट के' असल्यामुळे त्या आकर्षक व सूचक आहेत. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवरील हल्ल्याचे पडसाद सर्वसामान्य जीवनावर पडलेले दिसून येतात. "लादेन' या द्विअर्थी शब्दामुळे वनमालाबाई दोन अतिरेक्यांना पकडून देण्यात यशस्वी होतात, याचे खुसखुशीत वर्णन शीर्षककथेत आहे.

"हिंदू-मुस्लिम ऐक्य' हा सामाजिक विषय गमतीदारपणे हाताळून रंजक बनविण्याचा प्रयत्न "मेरे महेबूब' यात केला आहे. संशयाचे पर्यवसान कुटुंब उद्धवस्त होण्यापर्यंत जाऊ शकते, हे "संशय का मनी आला' यातून खुमासदारपणे मांडले आहे. चित्रपटसृष्टीचा युवा पिढीवर नको एवढा प्रभाव पडल्याचे "हम दिल दे (कर) चुके सनम' यातून प्रत्ययास येतो.

मराठी भाषेची उपेक्षा थांबविण्यासाठी बंडू उपाध्यायांच्या प्रयत्नांमुळे अधिकच उपेक्षा होत असली तरी त्यातून विनोदनिर्मिती होते. अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वत:ची तुंबडी भरणारे अवतीभवती असतात, हे "गाव दुष्काळात पर सुताराचा गेना सुकाळात'तून प्रतीत होते.

घोडेगावकर, हत्तीकणबसकर, अस्वले, हरणशिकारे, वाघ, वाघमारे, लांडगे, मगर, गायधनी, संपूर्णसिंह या नावांचा चपखल वापर करून मानवजातीचे पशूंशी असलेले "अतूट' संबंध "बिबट्याची गोष्ट'मधून जाणवते.

याशिवाय सर्वधर्मसमभाव, राजकीय डावपेच, पाणीवाटप प्रश्नांचा वेगवेगळ्या कथांतून मागोवा घेतला आहे.

जोश ए धटिंगण, लष्कर-ए-आडदांड- होयबा, तंटापूर अशा मिस्कील शब्दांमुळे कथा हलक्याफुलक्या आणि मार्मिक झाल्या आहेत.

- सुनीता पोखरणा.
View full details