Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Aathvanche Zele by Laxmikamal Gedam

Aathvanche Zele by Laxmikamal Gedam

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge

लक्ष्मीकमल गेडाम यांनी बहुविध वाङ्‌मय-प्रकारात 

विपुल लेखन केले असले तरी ललित-लेखन हा त्यांचा आवडता वाङ्‌मय-प्रकार आहे. तो त्यांच्या स्वभावाशी, अनुभवाशी, 

निरीक्षणशक्तीशी जुळणारा तर आहेच, पण त्यात त्यांची चिंतनशील वृत्ती प्रगट होते. यासाठी आवश्यक असणारी संवेदनशील वृत्ती व प्रतिभा त्यांच्याकडे आहे.

माणसांविषयीचे प्रेम व त्यांची जीवनविषयीची आस्था 

यामुळे या लेखांना भावात्म मूल्य प्राप्त झाले आहे. 

लेखिकेच्या सुहृदयी वृत्तीचे, संस्कारसंपन्नतेचे आणि 

सुसंस्कृतपणाचे एक लोभस दर्शन ह्या लेखांतून होते.

रूढी-परंपरांचा जाणीवपूर्वक घेतलेला शोध, डोळस वृत्तीने 

लोक-परंपरा व लोकसंस्कृतीचा लावलेला अन्वयार्थ व 

त्यातही विशेषतः प्रकटणारे स्त्री-मन व स्त्री-जीवन 

गेडाम यांच्या लेखनातून पाझरते. हा ओलेपणा 

ह्या लेखांना असल्यामुळेच साध्या, सरळ व ओघवत्या भाषेत 

हे लेख उतरले आहेत.

हे ‘आठवांचे झेले’ म्हणूनच अधिक सुगंधित झाले आहेत.

View full details