Inspire Bookspace
Aarogyavedh by Dr. Ratikant Hendre
Aarogyavedh by Dr. Ratikant Hendre
Regular price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 54.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
डॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ३४ वर्षे कार्यरत होते. त्यांनी मॉलिक्युलर बायॉलॉजीमध्ये संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएच्.डी.पदवी मिळविली. टिश्यू कल्चरमधील त्यांचे संशोधन पथदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या या संशोधन कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘सी.एस.आय.आर. (CSIR) टेक्नॉलॉजी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. वर्तमानपत्रात आरोग्यासंबंधीच्या बातम्या, प्रदुषणामुळे निर्माण झालेल्या समस्या, याविषयांचा मजकूर नेहमीच प्रसिद्ध होत असतो. मग ती बातमी मलेरियाच्या पुनरागमनाबद्दलची असते, पल्सपोलिओ लसीकरण मोहिमेची असते, आर्सेनिक आणि फ्लोराईडयुक्त पाण्यासंबंधीची असते तर आता विस्मृतीत गेलेल्या देवी रोगाच्या विषाणूसंबंधीची असते. आणखी कितीतरी नवीन विषय असतात. आपण हे सर्व वाचत असतो. परंतु संशोधक वृत्तीचा लेखक त्या आरोग्यविषयक बातमीच्या आड दडलेली शास्त्रीय माहिती शोधत असतो. या पुस्तकात आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्याच्या समस्येला स्पर्श करणारे, नवे विषय, नवी माहिती देणारे लेख आहेत. आरोग्याशी संबंधित अशा विषयातील ही भ्रमंती. माहितीपूर्ण तर आहेच; परंतु ती तितकीच मनोवेधकही आहे.
