Half Price Books India
A.R.Rehman - Sangeetateel Vadal By Kamini Mathai

Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
१९९२ .. रोजामधील दिल है छोटासा या आशादायी गीताद्वारे त्याने साद घातली ... अखिल भारतातील संगीत रसिकांना त्यातील बहुस्तरीय संगीतातून चित्रपटसंगीतातील परिवर्तनाची गाज ऐकू आली. २००९ ... स्लमडॉग मिलिऑनेर मधील जय हो गीताद्वारे त्याने आनंददायी पुकारा केला ... जगाच्या कानाकोपर्यातील रसिकांना त्यातून चैतन्यदायी सामुहिक ऊर्जेची अनुभूती लाभली ... रहमानचे हात ऑस्करच्या आसमंताशी पोहोचलेले होते. ए. आर. रहमानची संगीत कारकीर्द अनेक अर्थाने वादळी ठरते; त्याचप्रमाणे जन्मापासून त्याचा जीवनप्रवासही थक्क करणारा ठरतो. रहमानचा संगीतप्रवास ० संगीतरचनेच्या रूढपद्धतीविरुद्ध बंड करणारी कार्यपद्धती ० आधुनिक तंत्रज्ञानावरील व ध्वनिपरिणामावरील हुकूमत ० सूफी ते पाश्चात्त्य संगीत अनेक प्रभाव ० विविध दिग्दर्शक, वादक, गायक, गीतकारांसोबतचा सुसंवाद ० अनेक गीतांच्या निर्मितीमागची प्रक्रिया, जीवनप्रवास ० अतीव दु:ख, अवहेलना, न्यूनगंड यांनी कोळपून गेलेलं बालपण ० धर्मांतर, धर्मनिष्ठा आणि संगीतनिष्ठा यातून लाभलेलं मनोबल ० संगीताप्रमाणेच त्याच्या जीवनालाही उभारी देणारं त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान अशा अनेक पैलूंच्या अंगाने रहमानच्या समग्र जीवन-संगीताचा वेध घेणारं पुस्तक.
युनिक फीचर्स १२ जुलै २०११ ...
मनस्वी कलाकाराच्या जीवनप्रवासाचा वेध
संगीतातलं वादळ आणि पूर्वेकडचा मोझार्ट असं ज्याला म्हटलं जातं त्या ए.आर. रहमानचा परिचय रसिकांना कामिनी मथाई यांनी ए. आर. रहमान - द म्युझिकल स्टॉर्म या आपल्या पुस्तकातून करून दिला आहे. मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा अनुवाद मराठीत करून मराठी वाचकांना भारतीय चित्रपटसंगीतात एका परिवर्तनाची सुरुवात करणार्या ए. आर. रहमान या आजच्या पिढीतल्या एका टेक्नोसॅव्ही संगीतकाराचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची संधी दिली आहे.
१९९२मध्ये रोजा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातल्या गाण्यांनी, विशेषत: दिल है छोटासा या नितांतसुंदर गाण्याने सर्वांना वेड लावलं आणि ए. आर. रहमान हे नाव देशातल्या रसिक श्रोत्यांच्या घराघरांत पोचलं. त्याच्या संगीतात पाश्चात्त्य सुरावटींचा वापर, हिंदुस्थानी संगीत, सूफी संगीत, लोकसंगीत अशा सर्व स्वरांचा एक सुरेल मेळ साधत या ताज्या दमाच्या तरुण संगीतकाराने आपला ठसा भारतीय चित्रपटसृष्टीत उमटवला. त्यानंतर वंदे मातरम या त्याच्याच आल्बममधलं त्यानेच गायलेलं आवेशपूर्ण मॉं तुझे सलाम हे गाणं असो किंवा स्लमडॉग मिलेनियरमधलं त्याला ऑस्कर पारितोषिक मिळवून देणारं जय हो हे गाणं असो, ए. आर. रहमान हे नाव त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतामुळे जगभरातल्या श्रोत्यांना सुपरिचित झालं.
अशा या बहुचर्चित आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर आपल्या संगीतात करून भारतीय चित्रपटसृष्टीत चित्रपटसंगीत आणि पार्श्वगायनाच्या अभिनव पद्धती सुरू करणार्या संगीतकाराचा यथार्थ परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे.
रहमानचं व्यक्तिचित्र अस्ताव्यस्त, विस्कळीत होऊ नये म्हणून लेखिकेने बारा प्रकरणांत त्याच्या व्यक्तित्वाचे वेगवेगळे आयाम शब्दबद्ध केलेले आहेत. त्यातून उभा राहतो तो आपल्याला सुपरिचित असलेला सुरावटींचा जादूगार ए.आर. रहमान, आणि त्याचबरोबर या सुरावटींमागचा लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेला, आईच्या आधाराने आणि मार्गदर्शनाने आयुष्यात स्वत:चं स्थान शोधायला धडपडणारा, कुटुंबाचा आर्थिक भार कोवळ्या खांद्यांवर पेलणारा दिलीप वाचकांच्या दृष्टीस पडतो. त्याच वेळी त्याच्या आईने स्वत:च्या दोन मुली आणि या मुलासह मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय आणि कोवळ्या वयापासूनच अत्यंत अडचणींचा, संकटांचा सामना करताना हळूहळू धर्मश्रद्धाळू बनत गेलेल्या ए.आर. रहमानचा प्रवासही लेखिका हळुवारपणे उलगड
ऊन दाखवते.आजही ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना आपल्या यशाचं पूर्ण श्रेय परमेश्वराला आणि आपल्या आईला देणार्या ए. आर. रहमानच्या व्यक्तित्वातले गुंतागुंतीचे कोपरे लेखिका संवेदनक्षमतेने वाचकांपुढे आणते. संगीताने अक्षरश: झपाटलेल्या संगीतकाराच्या संगीतनिर्मितीचे क्षण आणि संगीतनिर्मितीची प्रक्रिया लेखिका तितक्याच रंजकतेने वर्णन करते. एका मनस्वी कलाकाराच्या वादळी आयुष
याचा घेतलेला हा वेध वाचनीय आहे.
- शुभदा चंद्रचूड